Home विदर्भ आर्णीत पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ...

आर्णीत पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्याकडून विकासकामांचा आढावा!

 

आर्णी: शेतकऱ्यांना शेतापर्यंत ये-जा करण्यासाठी योग्य व सुविधाजनक रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आर्णी येथे पाणंद रस्त्यांच्या विकासाबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. आर्णी–केळापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

या बैठकीत पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच पावसाळ्यात व इतर वेळी शेतकरी बांधवांना रस्ते नसण्यामुळे येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी आमदार तोडसाम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने व योग्य त्या सूचना दिल्या.

बैठकीला विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतकरी बांधवांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती देण्याचा दृढ निर्धार यावेळी मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी व्यक्त केला.

— आर्णी–केळापूर विधानसभा क्षेत्र