वरोरा (प्रतिनिधी) :- वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठ, मित्र चौक, डोंगरवार चौक, पद्मावार चौक ते गणेश विसर्जन स्थळ परिसरातील कमी उंचीच्या धोकादायक विद्युत तारांमुळे येणाऱ्या गणेश व दुर्गा विसर्जन मिरवणुकांच्या वेळी मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. डीपीडीसी योजनेअंतर्गत मंजूर ११.५० लाखांचा निधी असूनही तब्बल ७ महिन्यांपासून प्रलंबित असलेले हे काम लालफितीच्या कारभारात अडकले होते.
हा जनहिताचा प्रश्न गांर्भीयाने घेत माजी सभापती तथा जिल्हा शांतता समितीचे सदस्य शेख जैरुद्दीन छोटूभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने निवेदन दिले होते. या आक्रमक व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, प्रशासनाने दखल घेत १९ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष विद्युत लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
बाजारपेठेतील ११ मीटर उंचीचे ४४ नवीन विद्युत पोल व सुमारे १००० मीटर कंडक्टर/केबल टाकण्याचे काम सुरू झाल्याने आगामी विसर्जन मिरवणुका आता पूर्णपणे निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडणार असून, वरोरावासीयांसह गणेशभक्तांचा मोठा जीव भांड्यात पडला आहे. छोटूभाई शेख यांच्या या धडाडीच्या भूमिकेचे व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या आक्रमक पुढाकाराचे संपूर्ण शहरातून जोरदार स्वागत होत आहे.
🙏 शेख जैरुद्दीन छोटूभाई माजी सभापती, वरोरा सदस्य, जिल्हा शांतता समिती, चंद्रपूर




