Home क्राईम राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; बुलेट चोरी करणाऱ्या इसमावर...

राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; बुलेट चोरी करणाऱ्या इसमावर कारवाई, १,००,०००/- चा मुद्देमाल हस्तगत

चंद्रपूर :- राजुरा पोलीस ठाणे हद्दीतील चुनाळा येथून चोोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल शोधण्यात गुन्हे शोध पथकाला (DB Squad) यश आले असून, अवघ्या काही दिवसांत आरोपीस वर्धा जिल्ह्यातून अटक करून चोऱ्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२/०८/२०२६ रोजी रात्री २३:०० वा. ते दिनांक ०१/०९/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोर (चुनाळा) उभी केलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटरसायकल अज्ञात चोराने पळवून नेली होती. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७१३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांच्या नेतृखाली डी.बी. इंचार्ज सपोनि लक्ष्मण लोकरे व पथक आरोपीचा शोध घेत होते. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तलोडी (कुटकी), ता. सेलु, जि. वर्धा येथे छापा टाकून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.



  • अटक आरोपीचे नाव व पत्ता:

    • अनुराग प्रवीण धावडे, वय २१ वर्ष, व्यवसाय: मजुरी, रा. तलोडी (कुटकी), ता. सेलु, जि. वर्धा.
  • जप्त मुद्देमालाचा तपशील:
    • काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटरसायकल (क्र. MH 34 AX 1120) — अंदाजे किंमत: ₹ १,००,०००/-.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष्य नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक श्री. कुमार सुशांत (उपविभाग राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर, गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि लक्ष्मण लोकरे, सपौवि किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वण, पोहवा अनुप डांगे, पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी व राजीव दुबे यांनी पार पाडली.