मुंबई :- महिला प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्या संयुक्त CSR उपक्रमातून आगामी तीन आर्थिक वर्षांत राज्यभरात तब्बल १२५ ‘हिरकणी कक्ष‘ उभारण्याचे ambitious (महत्त्वाकांक्षी) नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे महिला व माता वर्गाचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
💥 तीन वर्षांचे नियोजन 💥
एमओयू (MOU) मधील करारानुसार, या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून त्याचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे:
👉 २०२६-२७ / ५० कक्ष उभारले जाणार.
👉 २०२७-२८ / ५० कक्ष उभारले जाणार.
👉 २०२८-२९ / २५ कक्ष उभारले जाणार.
वशेष तरतूद :- सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची लवचिक तरतूदही करारात ठेवण्यात आली आहे.
💥 एसटी महामंडळाची नेमकी जबाबदारी काय 💥
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एसटी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे:
जागा व सुविधा :- महामंडळाकडून प्रकल्पासाठी सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच आवश्यक वीज, पाणी आणि स्थापनेसाठी सहकार्य व शासकीय परवानग्या मिळवण्याचे काम केले जाईल.
संचालन व देखरेख :- प्रकल्प पूर्ण होऊन सर्व सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर, या क कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी एसटीचीच राहणार आहे.
विशेष वैशिष्ट्य :-:एसटीची तिजोरी सुरक्षित!
या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान असणार नाही.टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर (CSR) फंडातून हा संपूर्ण उपक्रम राबविला जाणार असून, यामुळे एसटीच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार न पडता प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.




