Home जिल्हा लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वरोरा :- ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोराचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी मंत्री लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज १५ सप्टेंबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



🙏 कार्यक्रमाचे नियोजन 🙏
👉 सकाळी ९.०० वाजता. 💠 उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
👉 सकाळी १०.०० वाजता.💠 कर्मवीर विद्यालय, वरोरा येथील लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांनी शिक्षण, सामाजिक विकास व जनसेंवेच्या क्षेत्रात केलेले कार्य सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि दादासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोराचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.