राजुरा (दि. १४ सप्टेंबर २०२६) :-चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व सहायक पोलीस अधीक्षक श्री. कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलिसांकडून विनापरवाना डीजे आणि साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांवर अत्यंत धडक व कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अशी होती गुप्त माहिती व कारवाईचा घटनाक्रम
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा येथील नवीन बस स्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनिय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहितीच्या आधारावर सपोनि लक्ष्मण लोकरे व पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, बोलेरो पिकअप क्र. MH-34-BZ-5017 वर डीजे वाजवण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.
सदर वाहनचालक व मालकाकडे डीजे/वाद्य वाजवण्याबाबतच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावून धनीप्रदूषण व शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डीजे साहित्य आणि वाहन जप्त केले.
🙏 गुन्हा दाखल व ताबात घेतलेले आरोपी 🙏
याप्रकरणी पोलीस ठाणे राजुरा येथे अप. क्र. ७३०/२०२६ कलम २२३ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ सहकलम १८, १३६ महाराष्ट्र पोलीस कायदा, १९६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खालील दोन आरापींना ताब्यात घेण्यात आले आहे:
१. रवि सतीश एकनकर (वय २८ वर्षे, व्यवसाय- डीजे मालक/ऑपरेटर, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशाह)
२. सचिन इंदुलाल सरोज (वय २२ वर्षे, व्यवसाय- चालक, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर)
💥 जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील 💥
👉 डायनॅटिक कंपनीचे ०२ साऊंड टॉप – किंमत अंदाजे १,००,०००/-
👉 क्रॅश कंपनीचे ०४ साऊंड बेस – किंमत अंदाजे २,००,०००/-
👉 क्राऊन कंपनीची ०१ मशीन – किंमत अंदाजे २४०,००,०००/-
👉 कॉईनर कंपनीचा ०१ मिक्सर – किंमत अंदाजे १२०,०००/-
👉 किलोंस्कर कंपनीचा ०१ जनरेटर – किंमत अंदाजे १,००,०००/-
👉 मंहिद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-34-BZ-5017) – किंमत अंदाजे १८,००,०००/-
एकूण जप्त मुद्देमाल: ११२,६०,०००/-
💥 कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार 💥
सदरची ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विकी निर्वण, पोहवा अनूप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या व विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम राजुरा पोलिसांनी दिला आहे.




