चंद्रपूर प्रतिनिधी :- यंदाच्या गणेशोत्सवात घराघरातील श्री गणेशाच्या आकर्षक सजावटीला नवे व्यासपीठ मिळणार असून SK Film Production, Chandrapur यांच्या वतीने ‘श्री गणेश सजावट रील फेस्टिव्हल–२०२६’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची संकल्पना मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या सजावटीचा आकर्षक व्हिडिओ तयार करून रील स्वरूपात सादर करायची आहे. पारंपरिक, आधुनिक थीमवरील तसेच पर्यावरणपूरक अशा कोणत्याही प्रकारच्या सजावटीला या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
उत्कृष्ट रील सादर करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या स्पर्धेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रील सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी खालील गुगल फॉर्मद्वारे आपली रील सादर करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
रील सबमिट लिंक: Google Form – श्री गणेश सजावट रील फेस्टिव्हल २०२६
“तुमची सजावट… तुमची क्रिएटिव्हिटी… आणि तुमची रील!” या घोषवाक्यासह अधिकाधिक गणेशभक्तांनी या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरातील बाप्पाच्या सजावटीला नवे व्यासपीठ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 🙏🏆




