Home जिल्हा रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने लोकमान्य विद्यालयात दहीहंडी महोत्सव जल्लोषात संपन्न; गोविंदा...

रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने लोकमान्य विद्यालयात दहीहंडी महोत्सव जल्लोषात संपन्न; गोविंदा पथकांचा अभूतपूर्व सहभाग!

वरोरा :- लोकमान्य विद्यालय, वरोरा येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने दहीहंडी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात आनंद, उत्साह, टीमवर्क आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. एकत्र आलो, एकत्र साजरे केले आणि एकत्रितपणे हा उत्सव अविस्मरणीय केला!
या दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी अत्यंत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या थरारक स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण खालीलप्रमाणे पार पडले:
💥 प्रथम पारितोषिक :- अनिल ठाकरे, अर्जनविस यांच्याकडून ₹५,०००/-
💥 द्वितीय पारितोषिक :- सुनील अयाचित यांच्याकडून ₹३,०००/-
💥 तृतीय पारितोषिक :- अर्फिता झेरॉक्स यांच्याकडून ₹२,०००/-
यासोबतच कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेल्या श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे विशेष पारितोषिक रोटरी क्लब, इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लब यांच्याकडून देऊन बालगोपालांचा व चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यात आला.



🙏 मान्यवरांची विशेष उपस्थिती 🙏
या दिमाखदार सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ वरोराचे मान्यवर योगेश डोंगरवार, अभिजित भाऊ बोथले, अदनान सिद्धीकोट, सुनील अय्याचित, तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोरा चे अध्यक्ष विककी आगलावे, नितीन भोजेकर, सुमित पारखी, हिमांशू केशवानी, आदित्य ठाकरे आणि क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच, ‘इनरव्हील क्लब’तर्फे संध्या बारयजी, टोंगे मॅडम,मोरे सर, चिखलीकर सर , सालवटकर सर , उईके सर , निकुंबे सर लोकमान्य विद्यालय चे संपूर्ण स्टॉप आणि इतर सदस्यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. संस्कृती आणि खेळाचा अनोखा संगम असलेला हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.