Home विदर्भ सरळ सेवा भरतीतील छोट्या संवर्गातील पदांच्या बिंदू नामावली पुनर्विलोचनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली...

सरळ सेवा भरतीतील छोट्या संवर्गातील पदांच्या बिंदू नामावली पुनर्विलोचनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित!

केळापूर :- सरळ सेवा भरती प्रक्रियेत छोट्या संवर्गातील पदे भरताना निर्माण होणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. सरळ सेवा भरतीमध्ये छोट्या संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या बिंदू नामावलीचे पुनर्विलोचन (Review) करून शासनाला ठोस उपाययोजना सुचविणे आणि सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:
🟨 अध्यक्ष :- मा. मुख्य सचिव
🟨 सदस्य :- डॉ. हेमंत सावरा, मा. लोकसभा सदस्य
🟨 सदस्य :- श्री. राजेंद्र गावित, मा. विधानसभा सदस्य
🟨 सदस्य :- श्री. राजू तोडसाम, मा. विधानसभा सदस्य
🟨 सदस्य :- अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग
🟨 सदस्य :- प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग
🟨 सदस्य :- प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
🟨 सदस्य :- सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
🟨 सदस्य :- सचिव, आदिवासी विकास विभाग
🟨 सदस्य – सचिव :-:सचिव (साविस), सामान्य प्रशासन विभाग
छोट्या संवर्गातील भरती प्रक्रियेतील कायदेशीर व प्रशासकीय गुंतागुंत सोडवून लवकरात लवकर योग्य तो अहवाल सादर करण्याचे मोठे आव्हान या समितीसमोर असणार आहे. यादरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा आर्णी तालुक्याच्या वतीने मा. आमदार श्री. राजू भाऊ तोडसाम यांचे अत्यंत उत्साहात व आक्रमक स्तरातून जोरदार अभिनंदन करण्यात आले आहे.