चिमूर :- CCI कडून शासकीय हमीभावाने कापूस विक्रीसाठी ‘कपास किसान’ ॲपवर नोंदणी बंधनकारक; चिमूर बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन.शासकीय कापूस विक्रीसाठी CCI (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची खरेदी लवकरच सुरू होणार असून, सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीपूर्वी मोबाईल ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.** बाजार समिती चिमूर अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार, नोंदणीची अंतिम मुदत ३१/१०/२०२६ पर्यंत आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी
ॲप डाऊनलोड :- शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर ‘कपास किसान’ ॲप डाऊनलोड करून घ्यावे.
सातबारा उतारा :- शेतीचा कापूस पिकोपेरा नोंद असलेला अद्ययावत सन २०२६-२०२७ चा सातबारा उतारा, पिकपेरा जवळ तयार ठेवावा.
ओळख व बँक कागदपत्रे :- आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत सोबत असणे आवश्यक आहे.
संमतीपत्र नियम :- सातबारा उताऱ्यावर एक पेक्षा जास्त नावांची नोंद असल्यास रु. १०० च्या मुद्रांकावर (स्टॅप पेपरवर) संमतीपत्र नोटरी करून तयार ठेवावी.
मोबाईल लिंकिंग :-आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक असून त्याशिवाय नोंदणी होणार नाही. चुकीची नोंदणी केल्यास कापूस विक्री नंतर बिलाची रक्कम मिळण्यास त्रास होऊ शकतो.
💥 नोंदणी प्रक्रिया कशी करावी 💥
🟨 ‘कपास किसान’ ॲप सुरू करून स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर आलेली OTP टाकून रजिस्ट्रेशन व नावा V निवडावे, नंतर स्वतःचा आधार क्रमांक टाकावा व त्यानंतर पुन्हा आलेली नवीन OTP टाकावी.
🟨 क्रमवार विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
🟨 शेतीचे क्षेत्र भरताना एकर मध्ये न भरता हेक्टर मध्ये भरावे.
🟨 सातबारा उतारा, पिकपेरा, आधार कार्ड व बँक पासबुक ची PDF तयार करून दर्शविलेल्या ठिकाणीच अपलोड करावी व आपली नोंदणी अचूकपणे पूर्ण करावी.
नोंदणी करताना काही अडचणी असल्यास किंवा चुकीची नोंदणी झाल्यास हमीभावाने कापूस विक्रीपासून वंचित राहण्यापेक्षा आपल्या हक्काच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, चिमूर चे कार्यालयात येऊन किंवा खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क करून आपली अचूक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन बाजार समिती चिमूर तर्फे करण्यात आले आहे.




