Home जिल्हा रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा; विविध महाविद्यालयांना भेट...

रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा; विविध महाविद्यालयांना भेट देऊन शिक्षकांचा गौरव.

वरोरा:-“शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा सन्मान!” या उदात्त विचारातून रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोरा तर्फे शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदराने सन्मान केला.
शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी रोटरॅक्ट क्लबच्या प्रतिनिधींनी प्रत्येक शिक्षकाला पेन, डायरी आणि गुलाबाचे फूल भेट दिले. ज्ञानाचा दीपस्तंभ असलेल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.



💥 उपस्थित पदाधिकारी💥
👉  विक्की आगलावे (अध्यक्ष)
👉  सुमित पारखी
👉  नितीन भोजेकर
👉  आदित्य ठाकरे
🙏 भेट दिलेल्या शिक्षण संस्था व महाविद्यालये 🙏
🟨  हिरालाल महाविद्यालय, वरोरा
🟨  एक्सलेंट ॲकाडमी, वरोरा
🟨  लोकमान्य महाविद्यालय, वरोरा
🟨  दिशा कॉलेज, वरोरा
🟨 आनंदवन कॉलेज, वरोरा
🟨  माता-महाकाली पॉलिटेक्निक, वरोरा
🟨  सिद्धिविनायक फार्मसी कॉलेज, वरोरा
रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षण क्षेत्रातून आणि नागरिकांमधून आनंद व्यक्त होत असून, शिक्षकांप्रति आदर व्यक्त करणारी ही मोहीम कौतुकास्पद ठरली आहे.