Home Breaking News चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई: आंतरराज्यीय तीन तस्करांकडून १७.४७५ किलो...

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई: आंतरराज्यीय तीन तस्करांकडून १७.४७५ किलो गांजासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर :-  जिल्ह्यात अवैध ड्रग्स आणि गांजा तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, बल्लारपूर राजुरा मार्गावर बामनी चौक येथे सापळा रचून आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या तीन तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे. या थरारक कारवाईत एकूण १७.४७५ किलो गांजा, एक चारचाकी वाहन आणि वापरते ०४ मोबाईल असा एकूण १७,०८,७५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



💥 असा मिळाला सुगावा 💥
दि. ०२/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, काही इसम ओडीसा येथून गांजा घेऊन चारचाकी वाहनाने सदर गांजा विक्रीकरिता घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे वल्लारपूर चौक येथे सापळा रचण्यात आला. यादरम्यान संशयित चारचाकी वाहन (क्रमांक एमएच-२४ बीआर-१२८२) अडवूनझडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा अवैध वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.



तपासणीत निष्पन्न झालेले आंतरराज्यीय आरोपी
१. अमोल रमेश कांबळे (वय ३३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. एरंडी सरोळा, ता. औसा, जि. लातूर)
२. सदानंद रविंद्र जना (वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. साबोरीया, ता. खालीगोंड, जि. गंजम, राज्य ओडीसा)
३. ओंगा विर कोवासी (वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकानगिरी, राज्य ओडीसा)



💥 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 💥
आरोपींकडून १३.४७५ किलो गांजा, गांजा सदृश्य वनस्पती १३.४७५ किलो, वापरलेले ०४ मोबाईल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण  १७,०८,७५०/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
💥 कायदेशीर कारवाई 💥
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन बल्लारशाह करीत आहे.



💥 मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक 💥
सदर धडक कारवाई मा. श्री. आयुष नोपानी (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) आणि मा. श्री. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक काकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सपोउपो स्वामीदास चालेकर, पोहवा अजय वाघेमर, गणेश भोयर, रामराव विघेखाडे, शरद कुडे, रजनीकांत पुट्टावार, सचिन गुरुले, सुभाष गोसेकार, प्रतिक हेमके, विठ्ठल काकडे, प्रफुल पुप्पलवार व पोशि/दिनेश उगडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.