आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते संपन्न ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
वरोरा, दि. १७ सप्टेंबर: शेगाव (बु.) येथे मेन रोड ते मेडिकल चौकापर्यंतच्या नवनिर्मित सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते फीत कापून व पूजा करून हा रस्ता नागरिकांच्या सेवाभावी वापरासाठी खुला करण्यात आला. प्रधानमंत्री खनिज विकास निधी 2024 -2025 अंतर्गत काम करण्यात येनार आहे.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नागरिकांना मिळणार मोठी सुविधा
या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे गावातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होणार असून, दैनंदिन प्रवासात मोठी सुविधा निर्माण होणार आहे.
- गावातील व्यापार, शैक्षणिक संस्था, दवाखाने तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाणे नागरिकांसाठी अधिक सोपे होईल.
- दर्जेदार आणि वेळेत विकास कामे पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा सतत प्रयत्न सुरू असल्याचे आमदार करणदादा देवतळे यांनी यावेळी सांगितले.
आमदारांची प्रतिज्ञा
“गावाचा सर्वांगीण विकास हा आमचा सामूहिक संकल्प आहे. मूलभूत सुविधा,पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधांसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे लोकार्पण म्हणजे शेगाव (बु.) गावच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, पुढील काळातही विकासाकामांचा वेग कायम राहील.” – करणदादा देवतळे, आमदार




