वरोरा :- ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोराचे संस्थापक तथा १९६२ ते १९७२ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री राहिलेले लोकनेते स्व. रामचंद्र उर्फ दादासाहेब देवतळे यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त वरोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व संपन्न झालेले सोहळे
👉 सकाळी ९.०० वाजता. उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
👉 सकाळी १०.०० वाजता. कर्मवीर विद्यालय, वरोरा येथील लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व माल्यार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांनी शिक्षण, सामाजिक विकास व जनसेवेच्या क्षेत्रात केलेले कार्य सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी याप्रसंगी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, वरोराचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे , तसेच बाळू भोयर, विजय मोकाशी, विठ्ठल लेंडे, जयंत ठाकरे, गोपाल धोटे, नरेंद्र भोयर, विजय पुरी, मंगेश मसाडे, वासुदेव उरकाडे, चरण मोडक, मुडेवार काकाजी, सचिन भोयर, उत्तमराव झाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने चाहतावर्ग प्रमुख उपस्थित होता.




