Home जिल्हा वरोरा येथे भाजपा कार्यालय, सुयोग हॉस्पिटलमध्ये बाप्पाचे आगमन विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न!

वरोरा येथे भाजपा कार्यालय, सुयोग हॉस्पिटलमध्ये बाप्पाचे आगमन विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न!

वरोरा (दि. १४ सप्टेंबर २०२६) गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाला आज, १४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात सुरुवात झाली असून, घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वरोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात (सुयोग हॉस्पिटल परिसर) श्री गणेशाची अत्यंत चैतन्यमय वातावरणात स्थापना करण्यात आली आहे.
आज दुपारी ४ वाजता श्री गणेशाची विधिवत पूजा, प्राणप्रतिष्ठापना आणि धार्मिक कार्यक्रम पार पडला. या मंगल प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
या शुभप्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते:
१. माननीय श्री. आमदार श्री. करणदादा देवतळे साहेब (आमदार, वरोरा-भद्रावती ७५) २. डॉ. सागर वझे सर
३. सौ. डॉ. मिरा सागर वझे, ४. संतोष पवार (भाजप शहर अध्यक्ष) ५. अनिकेत नाकाडे (युवा मोर्चा अध्यक्ष, भाजयुमो) ६. दिलीप घोरपडे ,७. अमित चवले ८. अभय मडावी,९. मयूर मेहता,१०. जगदीश तोटवार,११. विलास दारापूरकर,१२. दीपक घुडे,१३. रुबिना शेख
गणेशोत्सवाच्या या पहिल्याच दिवशी भाजपा कार्यालय परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण पाहायला मिळाले. बाप्पाच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून, आगामी दिवसांत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन कार्यालयीन परिसरात केले जाणार आहे. सर्व नागरिक व कार्यकर्त्यांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.