Home विदर्भ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ जनसागर अभियान धडाधड पुढे; भंडारा व...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ जनसागर अभियान धडाधड पुढे; भंडारा व गोंदियात निर्णायक बैठका व पत्रकार परिषदांचे आयोजन!

भंडारा :- विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘स्वतंत्र विदर्भ’ राज्याच्या मागणीसाठी पूर्व विदर्भात आपले जनसागर अभियान जोरदारपणे सुरु ठेवले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून, आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठका आणि पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.
अभियानाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी, समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रा. पी. आर. राजपूत, आणि पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे व प्रा. पद्माताई राजपूत यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे.



💥 भंडाऱ्यात धडकणार जनसागर 💥
अभियानाचा पहिला टप्पा शुक्रवारी, दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी भंडाऱ्यात धडकेल. दुपार १२ वाजता जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तर सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल. यावेळेस स्थानिक पदाधिकारी, संजय भाऊ केबत (विभागीय अध्यक्ष, भंडारा गोंदिया) आणि विजय नवखरे (अध्यक्ष, भंडारा जिल्हा), हे सर्वांचे स्वागत करतील. मुक्काम आणि पत्रकार परिषदेचे स्थळ शासकीय विश्रामगृह, भंडारा, येथे असेल.



💥 गोंदियातही जनजागृतीचा झंझावात 💥
दुसऱ्या दिवशी, शनिवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी, हे जनसागर अभियान गोंदियात पोहचेल. तिथेही, दुपार १२ वाजता जिल्हा बैठक आणि सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल. येथील स्थानिक पदाधिकारी, छेलबिहारी अग्रवाल (अध्यक्ष, गोंदिया जिल्हा) आणि अतुल सतदेवे (समन्वयक, गोंदिया जिल्हा), संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था पाहतील. स्थळ शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे राहील.
💥 अभियानाचे मुख्य विषय 💥
या जनसागर अभियानात प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा करण्यात येईल:
१. नागपूर करार होळी :- विदर्भ राज्य आंदोलन समितीने २८ सप्टेंबर २०२६ रोजी ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमध्ये नागपूर करार होळी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात येईल.
२.विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा :- २ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्धा येथे होणाऱ्या ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’च्या तयारीबद्दल चर्चा करण्यात येईल.
३. संघटनात्मक बांधणी :- संघटनेची बांधणी मजबूत करण्यासह कोर कमिटी मेंबर वाढवण्यावर भर दिला जाईल.
४. अध्यक्षांच्या परवानगीने :- वेळप्रसंगी अध्यक्षांच्या परवानगीने इतर महत्त्वाचे विषय सुद्धा मांडण्यात येतील.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ जनसागर अभियान हे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी एका निर्णायक टप्प्यावर आहे. या अभियानाद्वारे समिती विदर्भवासियांमध्ये जनजागृती करून आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘जय विदर्भ! जय विदर्भ!!’ हा नारा सर्वसामान्यांच्या मनात घर करत असून, या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.