वरोरा :-दिनांक 31/07/2026 वरोरा नगर परिषद हद्दीतील कमला नेहरू प्रभाग 10 मधील चिरघर प्लॉट परीसरातील रहिवास्यांनी त्यांचा त्याब्यातील नजूल व भाडेपट्ट्याच्या (leashold) जमिनी शासन धोरननुसार भोगावंतदार वर्ग -1 (स्वमलकी / फ्री होल्ड ) मध्ये रूपांतरित करून सदन व मालमत्ता पत्रकात नोंदी मिळण्याबाबत पालकमंत्री वर्धा जिल्हा डॉ. पंकज भोयर यांना सामूहिक विनंती अर्ज सादर केला आहे.चिरघर भागातील रहिवासी मागील 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी अस्थायी / भाडेपट्ट्याचा भूखंडावर वास्तव्यात आहे, पूर्वी नगरपरिषद व शासनाच्या धोरणानुसार त्यांना निवासी वापरासाठी लिलावाद्वारे हे भूखंड मंजूर करण्यात आले, स्थानिक नागरिक नगरपरिषद ची मालमत्ता व नजूल भाडेपट्ट्याची रक्कम अदा करत आहे.
🙏 रहिवाशांची प्रमुख अडचणी 🙏
1. एक भाडेपट्ट्यांची मुदत संपणे भूखंडाची मदत संपल्यामुळे अखंड भूखंडाची मुदत संपल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे.
2. बँक कर्ज मिळण्यात अडथळ वर्ग -2 च्या जाचक अटी – शर्ती मुळे किंवा इतर व्यवसाय कर्ज मिळणे कठीण झालेले आहे थेट मालकी हक्क नसल्यामुळे वारस नोंदणी तसेच भूखंडाचा खरेदी-विक्री करताना करताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून परिवारातील आर्थिक व सामाजिक धैर्य कमी होत आहे.
अतिक्रमण नियमानुकुल व विशेष अभय योजनेअंतर्गत मागणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 16 मार्च 2024 आणि 26 ऑगस्ट 2025 विभागातील दिलेल्या निवासी प्रयोजनार्थ दिलेल्या अजून जमिनीच्या रूपांतरित करण्यासाठी विशेष अभय योजना राबवण्यात येत आहे तसेच महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता जमिनीवर 1966 च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 01/01/2011 पर्यंतची निवासी 2011 पर्यंतच्या निवासी निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत 25 मार्च 2026 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार विचार करून प्लॉटमधील रहिवाशांना तातडीने व मालकीचा हक्क देण्यात यावा…
अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सदर समस्येचा गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री वर्धा डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, वरोरा विधानसभेचे आमदार करणदादा देवतळे तसेच उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा निवेदन प्रति पाठवून या विषयाची योग्य ती नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
सदर निवेदन चिरघर प्लॉट चे रहिवासी संजू विक्रम राम यांच्या नेतृत्वात राहुल दागमवार, प्रशांत सरुडकर, रोशन उगले , देऊळकर काकाजी, काळे काकाजी , वरुडकर काकाजी, काकडे काकाजी, रवी वाटकर, महेश बोधाने, राजू पराते , रवी महागमकर , राहुल मालवे, निशांत वरुडकर, कैलास पारशिवे आणि बहुसंख्येत नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलेले आहे.




