Home Breaking News शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तातडीने थांबवावे: आमदार ज.मू.अभ्यंकर

शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तातडीने थांबवावे: आमदार ज.मू.अभ्यंकर

वरोरा :-  शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार असून, शासनाने शिक्षण क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष तातडीने थांबवावे, अशी आक्रमक भूमिका मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज.मू.अभ्यंकर यांनी वरोरा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. ते वरोरा येथील शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्क कार्यालयात बोलत होते.



शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहचे लोकार्पण
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक मनीष जेठाणी, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू, महिला सेना जिल्हाप्रमुख भावना खोब्रागडे, नगरसेवक नंदू पडाल, घनश्याम आसवले, मोहब्बळाचे सरपंच नंदलाल टेमर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.शिक्षणाचा अधिकार आणि शासनाची जबाबदारी
यावेळी बोलताना आमदार ज.मू.अभ्यंकर यांनी राज्यघटनेतील कलम २१-अ नुसार प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षणाचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.



💠 विद्यार्थी संख्येचा निकष चुकीचा :- केवळ विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे निकष अयोग्य असून, शाळेत एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.



💠 आधुनिक सुविधांची गरज :-सरकारी शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, समृद्ध ग्रंथालये, आधुनिक प्रयोगशाळा आणि मूलभूत सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.



💠बालवयातील शिक्षण :- बालवयातील शिक्षण अत्यंत पायाभूत असल्याने या टप्प्यावर विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळणे गरजेचे असल्याचे नमूद करत, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.



🙏 गुणवंतांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम🙏
दौऱ्यादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांचा सत्कार आमदार ज.मू.अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला:
👉 मोहक चवले :-सीईटी परीक्षेत राज्यस्तरावर प्रथम आलेला वरोरा येथील ‘एक्सीलेंट अकॅडमी’चा विद्यार्थी.
👉 सुरभी जाजू :- सीईटी परीक्षेत ९९.९९ गुण प्राप्त करणारी वरोरा येथील विद्यार्थी.
👉 अपेक्षा पामपट्टीवार :-‘मिसेस इंडिया एलिग्टा क्वीन’ किताब पटकावल्याबद्दल विशेष सत्कार.
तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोकाशी लेआउट येथील झोपलेला मारुती देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान समितीचे माथनकर, अरुण ढोके, पीजदूरकर, भोसकर, मोघे, नारायण वराटकर, रामदासजी भोयर, सुरेशजी देशमुख, अनिल बोधे, नितीन उमरे आदी नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.