वरोरा :-राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा ग्रामीण भाजपा (खंबाळा-सालोरी मंडळ) आणि भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कोसरसार येथे रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा भव्य उपक्रम उत्साहात संपन्न झाला. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
कोसरसार येथील विठ्ठल मंदिर हॉलमध्ये आयोजित या शिबिराला आमदार करणदादा देवतळे यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी २२ जुलै रोजी ‘दादासाहेब देवतळे शेतकरी भवन’ येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमांची माहिती दिली.
सामाजिक बांधिलकीचा जागर: शंभरीकडे वाटचाल
या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला असून, बातमी लिहेपर्यंत ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य व नेत्र तपासणीसाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दिग्गजांची उपस्थिती
या कार्यक्रमाप्रसंगी खंबाळा-सालोरी मंडळ अध्यक्ष राजेंद्र सवाई, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सूरज धात्रक, माजी पं.स. सदस्या पापिता ताई गुळघाणे, कोसरसारचे सरपंच गणेशभाऊ मडावी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नरहरी तडस, सदस्य गोपाळराव गुळघाणे, डॉ. राऊत, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल गुळघाणे, आकाश भांडे, प्रफुल थुटे, किशोर भाऊ डांगरे, अनिकेत भाऊ नाकाडे, संयोजक राहुल भाऊ बांदुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आयोजकांनी या शिबिराच्या यशासाठी वैद्यकीय पथक, रक्तपेढीचे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे विशेष आभार मानले आहेत.




