वरोरा :- वरोरा शाळां व कॉलेजेस मध्ये ये जा करणारे मुली मुलं दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा येथील गावातील विद्यार्थी-विद्या र्थिनी आहेत. कॉलेजला येण्यासाठी परिसरातील गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात.परंतु शाळा कॉलेजेस सुरू झाले तेव्हापासून सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी येणाऱ्या बस नियमित वेळेत येत नव्हत्या. बस उशिरा आल्यामुळे कॉलेजला वेळेवर पोहोचता येत नव्हत. त्यामुळे पहिले 1-2 तासांचे लेक्चर, प्रॅक्टिकल आणि महत्त्वाच्या सूचनांना विद्यार्थ्यांना मुकावे लागत होत. हजेरीला देखील याचा फटका बसत होता. संध्याकाळच्या बसेस गावाकडे जाण्यासाठी वेळेवर लागत नसल्यामुळे शैक्षणिक आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना व कुटुंबांना प्रचंड सहन करावा लागत होता .मुली घरी येतपर्यंत आई-वडिलांचे जीव कासावीस होत होता आणि या प्रवासात विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्यामुळे सुरक्षिततेची काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची व्यथा समजून घेत सौ. रंजनाताई पारशिवे जिल्हाध्यक्ष. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चंद्रपुर,
विदर्भ प्रांत अध्यक्ष.राष्ट्रीय ओबीसी. एससी.एसटी क्रांती दल. यांनी पुढाकार घेऊन या सपुर्ण विदयार्थीनीची व्यथा आगार प्रमुखांसमोर बोलून दाखवली . आगार प्रमुखाने व वि.विभागीय नियंत्रक साहेब यांनी या विषयाची त्वरित दखल घेऊन गाड्यांचे वेळापत्रक मध्ये त्वरित सुधारणा केली विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्वरित अंमलबजावणी कडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याच्या बसेस वेळेवर सोडण्याची हमी विद्यार्थ्यांना दिली . त्यामुळे आता बसेस नियमित सुरू झालेले आहेत आई-वडिलांना निर्माण झालेली काळजी आता कमी झाली आहे. एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांबाबत लोकांमध्ये सुद्धा चांगली भावना निर्माण झाली आहे.निवेदन देऊन समस्या मांडताना खालील विद्यार्थी उपस्थित होते.
सानिया अनिल कार्लेकर ,साक्षी संजय कार्लेकर, प्रतीक्षा रवींद्र ढोले, प्रिया राजू कारमेंगे
यावेळी माझ्यासोबत .सौ. विधानाई गोरघाटे, श्रीमती. शीलाताई कोटनाके,सुरज पारशिवे, आकाश कोळसे, शिवम पेन्दोर हे सर्व उपस्थित होते. त्यांचे नेतृत्व सौ. रंजना म. पारशिवे जिल्हाध्यक्ष. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चंद्रपुर यांनी केले असून विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवून दिला आहे.




