Home Breaking News वेस्टर्न कोलफिल्ड्स (WCL) मधील मनमानी कारभाराविरुद्ध घुग्घूसमध्ये धडकणार ‘भव्य जनआक्रोश सभा :-...

वेस्टर्न कोलफिल्ड्स (WCL) मधील मनमानी कारभाराविरुद्ध घुग्घूसमध्ये धडकणार ‘भव्य जनआक्रोश सभा :- मा. बच्चूभाऊ कडू यांचे नेतृत्व

चंद्रपूर :- वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि स्थानिकांच्या हक्कासाठी आता जनआक्रोश उसळला आहे. स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची भरती, कंत्राटी कामगारांचे शोषण, कमी वेतन आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी येत्या  १९ जुलै २०२६ रोजी घुग्घूस येथे एका ऐतिहासिक ‘भव्य जनआक्रोश सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे.




मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सभेत स्थानिक बेरोजगार, कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही सभा केवळ एक आंदोलन नसून स्थानिकांच्या अन्यायाविरुद्धचा एक बुलंद एल्गार आहे.
सभेची महत्त्वाची वैशिष्ट्ये :-विषय  WCL मधील कंत्राटी कंपन्यांची मनमानी, कामगारांचे शोषण, पर्यावरणाचे नुकसान आणि आरोग्यविषयक समस्यांविरुद्ध लढा.
अहवान :-सभेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या समस्या आणि मागण्यांचे स्वतंत्र निवेदन सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
💥 दिनांक :-१९ जुलै २०२६ (रविवार)
💥 वेळ :- दुपारी १:३० वाजता
👉 स्थळ :- स्नेहा प्रभा मंगल कार्यालय, घुग्घूस, जि. चंद्रपूर.
“स्थानिकांचा हक्क आणि कामगारांचा सन्मान” हे या लढ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देण्यासाठी या सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे (एकनाथ शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आले आहे. स्थानिकांची उपस्थितीच या लढ्याची खरी ताकद ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- ☎️ ९६३७९७८२४०, ☎️ ७६६६९०८२१०