Home राजकारण खडसंगी येथे मतदार जनजागृती अभियान उत्साहात संपन्न; काँग्रेस पक्षातर्फे मतदारांना केले मार्गदर्शन.

खडसंगी येथे मतदार जनजागृती अभियान उत्साहात संपन्न; काँग्रेस पक्षातर्फे मतदारांना केले मार्गदर्शन.

खडसंगी (ता. चिमूर) :-भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘एस.आय.आर.’ (SIR) मतदार जनजागृती अभियानांतर्गत, चिमूर तालुका एस.आय.आर. समन्वय समितीच्या पुढाकाराने काँग्रेस पक्षातर्फे आयोजित ‘बीएलए-२’ (BLA-2) मार्गदर्शन शिबिर नुकतेच श्री. संत जगनाडे महाराज सभागृह, खडसंगी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.




💠 लोकशाही बळकट करण्याचा निर्धार 💠
या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने खडसंगी-गदगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांमध्ये मतदार यादीत नाव नोंदणी करण्याबाबत व्यापक जनजागृती केली. निवडणूक आयोगाच्या विविध नियमांमुळे सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा करून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे ही लोकशाहीची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी केले.




💠 दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन 💠
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सहसचिव प्रा. राम राऊत सर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस नेत्या शिवानीताई वडेट्टीवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. विजय गावंडे-पाटील, एस.आय.आर. चिमूर विधानसभा अध्यक्ष विजयजी घरत, जुनेद भाई खान, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटक धनराज भाऊ मुंगले, चंदाताई कारेकर, माजी बांधकाम सभापती गुणवंत पाटील कारेकर, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले व नागेंद्रजी चट्टे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग यावेळी एड. धनराज वंजारी, बब्बू खान, नामदेवराव डोये, प्रदीप भाऊ तळवेकर यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मतदार नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता घराघरात पोहोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.