गडचांदूर:- कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या १२ गोवंश जनावरांची गडचांदूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ७ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २२ जून २०२६ रोजी गडचांदूर पोलिसांना गोवंश तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोजा आसन बस स्टॉपजवळ सापळा रचला. संशयास्पद बोलेरो पिकअप (क्रमांक MH ३२-AJ-६४७१) अडवून तपासणी केली असता, त्यात १२ गाई अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती.
💠 आरोपीची कबुली 💠
आरोपीकडे विचारपूस केली असता, त्याने ही जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी नेत असल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपी संतोष रामाजी परचाके (वय ३५, रा. कळंब हळदी पुरा, ता. जि. यवतमाळ) याला ताब्यात घेतले असून, त्याचा फरार साथीदार (वाहन चालक) याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
👉 पोलिसांची मोठी कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम व त्यांच्या पथकाने (सपोनी सुखदेव गोदे आणि इतर कर्मचारी) केली आहे. भरदिवसा उघडपणे चाललेली ही गोवंश तस्करी गडचांदूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळली गेली आहे.




