Home Breaking News विकासकामांचा धडाका! भद्रावती तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाचे काम पूर्ण, विकासाची नवी गती

विकासकामांचा धडाका! भद्रावती तालुक्यात रस्ते मजबुतीकरणाचे काम पूर्ण, विकासाची नवी गती

भद्रावतीक्ष :- भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विलोडा चे नवे बांधकामाचे उद्घाटन झाले असून.विकासकामांनी वेग घेतला असून, दुर्गम व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी दिली जात आहे. याच मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे, ‘कोकेवाडा ते वडाळा’ या मार्गाचे मजबुतीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामाचे उद्घाटन झाले आज त्याचे लोकार्पण सोहळा पार पडला.
विकासाच्या गतीने बदलणारे चित्र
जिल्हा वार्षिक योजनेतून (२०२५-२६) सुमारे २० लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी खर्च करण्यात आला आहे. यामुळे कोकेवाडा ते बडाळा दरम्यानचा प्रवास आता सुखकर आणि वेगवान होणार आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून विकास साधण्याचा संकल्प आमदार करणभाऊ देवतळे यांनी सिद्ध केला आहे.
लोकार्पण सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती
उद्घाटक :- मा. आमदार श्री. करणदादा देवतळे (वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र)
अध्यक्ष :- मा. श्रीमती गीताताई मानगुडधे (सरपंच, ग्रामपंचायत विलोडा)
प्रमुख पाहुणे :- श्री. भानुदासजी गायकवाड (माजी पं. स. सदस्य) आणि श्री. मारोती भाऊ गायकवाड (माजी जि. प. सदस्य)
या सोहळ्याला ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या रस्त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना वर्षभर दळणवळणाची उत्तम सुविधा मिळणार आहे. भद्रावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार करणभाऊ देवतळे यांचा हा ‘मिशन मोड’ परिसराच्या विकासात मैलाचा दगड ठरत आहे.