नागपूर :- खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट आता थांबणार आहे! काही हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांना केवळ त्यांच्याच हॉस्पिटलमधील औषध दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या मनमानी कारभाराची आता गंभीर दखल घेण्यात आली असून, रुग्णांवर अशी सक्ती करणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
👉 काय आहे शासन आदेश ?
‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) यापूर्वीच स्पष्ट आदेश जारी केले आहेत (परिपत्रक क्र. औवि/रुग्णालय/१६६-२२/१५, दि. ०९/१२/२०२३). या आदेशानुसार:
👉 प्रत्येक हॉस्पिटलने आपल्या दर्शनी भागात “हॉस्पिटलमधूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही”असा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक आहे.
रुग्णाला त्याच्या पसंतीच्या कोणत्याही दुकानातून औषधे घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
रुग्णांनो, घाबरू नका! तक्रार करा
जर एखादे हॉस्पिटल तुम्हाला औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती करत असेल, तर गप्प बसू नका. आपण खालील मार्गांनी त्वरित तक्रार नोंदवू शकता:
ईमेल :- comm.fda-mha@nic.in
फोन :- ☎️ ०२०-२६५९०५४८
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून मदतीचा हात
सामान्य नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणारी ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ आता या लढाईत उतरली आहे. कोणतीही ग्राहक-केंद्रित समस्या असल्यास, ग्राहक या संस्थेशी संपर्क साधू शकतात. आमचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर कोणतीही फी न घेता निःस्वार्थ भावनेने सेवा देत आहेत.
👉 “रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या हॉस्पिटलची गय केली जाणार नाही. जर कुठे अशी सक्ती होत असेल, तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा.”
👉 श्री. राजेंद्र बंडगर , अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संपर्क :-☎️ ९९७५७१२१५३
संपर्क पत्ता :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
👉 वेबसाईट :- www.abgpindia.com
जागृत राहा, आपली औषधे आपल्या पसंतीच्या दुकानातून खरेदी करा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.
Home Breaking News रुग्णांची लूट थांबवा! हॉस्पिटलमध्ये औषध खरेदीची सक्ती केल्यास होणार कठोर कारवाई; ‘अखिल...




