नागपुर :- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि बडे उद्योजक अरुण लखानी आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, लखानी हे भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरुद्ध थेट भाजप असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या बातमीने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




