Home Breaking News वणी तालुक्यातील प्रदूषण: एमपीसीबीकडून कारवाईचा बडगा; विविध खाणी आणि उद्योगांना नोटिसा.

वणी तालुक्यातील प्रदूषण: एमपीसीबीकडून कारवाईचा बडगा; विविध खाणी आणि उद्योगांना नोटिसा.

चंद्रपूर :- वणी तालुक्यातील कोळसा खाणी, गिट्टी क्रशर आणि ‘एसीसी’ सिमेंट कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) संबंधित खाणी आणि उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

🙏खाणींना बजावल्या नोटिसा🙏म

माहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर उप-प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वणी तालुक्यातील वेकोलिच्या विविध खाणींची वेळोवेळी पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत संबंधित खाणींना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने:

👉 वेकोलि बेलोरा नायगाव खुली खाण

👉 वेकोलि निलजई खुली खाण

👉 वेकोलि मुंगोली-निरगुडा खुली खाण

👉 वेकोलि घोन्सा खुली खाण

या खाणींना प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. तसेच, वेकोलिच्या कोलरपिंपरी कोळसा खाणीलाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

🙏चूना भट्या आणि एसीसी कंपनी रडारवर🙏

राजूर परिसरातील चूना भट्यांची पाहणी केली असता, सहा भट्यांनी संमतीपत्रातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर मुख्यालयात सुनावणी घेऊन त्यांना अंतरिम निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, घुग्घूस येथील ‘एसीसी सिमेंट’ कंपनीलाही अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्देश देण्यात आले असून, कंपनीवर पुढील कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी या प्रदूषणाबाबत तक्रार केली होती. यावर प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता संबंधित उद्योगांवर कायदेशीर वचक बसेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏