Home Breaking News चंद्रपुरात गुटखा माफियांचे धाबे दणाणले! रामनगर आणि सिंदेवाहीत पोलिसांची मोठी कारवाई; ५.११...

चंद्रपुरात गुटखा माफियांचे धाबे दणाणले! रामनगर आणि सिंदेवाहीत पोलिसांची मोठी कारवाई; ५.११ लाखांचा मुद्देमाल जप्त ३ आरोपी अटकेत, कुख्यात वसिम झिमरीसह दोघे फरार.गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही अवैध धंदा जोरात; ‘मकोका’ लावण्याची जनतेची मागणी.

चंद्रपूर :- चंद्रपुरात गुटखा माफियांचे धाबे दणाणले! रामनगर आणि सिंदेवाहीत पोलिसांची मोठी कारवाई; ५.११ लाखांचा मुद्देमाल जप्त ३ आरोपी अटकेत, कुख्यात वसिम झिमरीसह दोघे फरार.गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही अवैध धंदा जोरात; ‘मकोका’ लावण्याची जनतेची मागणी.जिल्ह्यातील अवैध सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पानमसाला माफियांच्या विरोधात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आखलेली आक्रमक रणनीती आता पूर्ण ताकदीने ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या याच मोहिमेचा भाग म्हणून १८ मे २०२६ रोजी जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे छापे टाकण्यात आले. रामनगर आणि सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी राबविलेल्या या धडक मोहिमेत पोलिसांनी एकूण ५ लाख ११ हजार ५३९ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी ३ आरोपींना रंगेहात अटक केली आहे, तर क्षेत्रातील कुख्यात तंबाखू व्यापारी वसिम झिमरी आणि जयसुख ठक्कर हे दोघे पोलिसांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
👉 १) रामनगर हद्दीत मोठा छापा: लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
१८ मे रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उपविभागीय पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला.
अटक केलेले आरोपी :- सिद्धांत माधव गोंडाने (वय ३२) आणि मोहम्मद अखिल शकील शेख (वय ४५, दोघेही रा. इंदिरानगर, चंद्रपूर).
फरार आरोपी :-कुख्यात माफिया वसिम झिमरी (रा. घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर).
👉 जप्त केलेला माल :-पोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित तंबाखू, ‘होला हुका शिशी’, ‘ईगल हक्काशी’ आणि इतर सुगंधी तंबाखू असा एकूण १ लाख ३५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

२) सिंदेवाहीत गुटखा-पानमसाला नेटवर्क उद्ध्वस्त!
त्याच दिवशी सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या सीमेतही उपविभाग ब्रह्मपुरी/मूल पथक आणि एलसीबी चंद्रपूरने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. सिंदेवाहीत सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या अवैध साठवणुकीचा व विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला.
👉 अटक केलेला आरोपी :-नरेश करमचंद भवानी (रा. सिंदेवाही).
फरार आरोपी :- जयसुख ठक्कर (रा. बल्लारशाह).
👉 जप्त केलेला माल :-पोलिसांनी या कारवाईत १४ प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि पानमसाला जप्त केला. याची एकूण किंमत ३ लाख ७६ हजार ८४ रुपये आहे.
👉 संघटित गुन्हेगारीवर मोठे प्रश्नचिन्ह; ‘मकोका’ची मागणी!
पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असतानाही, जिल्ह्यात अवैध तंबाखू आणि गुटख्याचा हा काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावरून हे स्पष्ट होते की, हा एखादा छोटा-मोठा धंदा नसून एक मोठे ‘संघटित गुन्हेगारी नेटवर्क’ (Syndicate) आहे. अटक झालेल्या आणि फरार असलेल्या अनेक आरोपींवर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. तरीही हे माफिया निर्धास्तपणे आपला व्यवसाय चालवत आहेत.
हा विषारी तंबाखू आणि गुटखा विकून तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या माफियांवर पोलीस केवळ सामान्य कलमांखाली गुन्हे का नोंदवतात? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जनस्वास्थ्याशी खेळणाऱ्या या माफियांविरोधात ‘मकोका’ (MCOCA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी आता चंद्रपूर जिल्ह्यातून केली जात आहे.

🙏 जय विदर्भ 🙏