Home Breaking News वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक १८ जूनला; ९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क !

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक १८ जूनला; ९७७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क !

चंद्रपूर  :- “तिनही जिल्ह्यात आचारसंहिता लागू; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन ” वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येत्या १८ जून २०२६ रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत तिनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण **९७७ कार्यरत सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यामुळे १८ मे पासून तिनही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार प्रामुख्याने उपस्थित होते.
👉 चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार
या निवडणुकीत तिनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा समावेश आहे. एकूण ९७७ मतदारांपैकी सर्वाधिक मतदार चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यानिहाय मतदारांची आकडेवारी खालीलप्रमाणे:

🙏 जिल्हा – मतदार संख्या – तपशील 🙏
|चंद्रपूर | ४६९ | चंद्रपूर मनपा: ६६ सदस्य <br> १० नगर परिषदा व ७ नगर पंचायती: ४०३ सदस्य |
| वर्धा | २६४ | १० नगर परिषदांचे एकूण २६४ सदस्य |
| गडचिरोली | २४४ | ३ नगर परिषदा व ९ नगर पंचायतींचे एकूण २४४ सदस्य |
| एकूण मतदार | ९७७ | तिनही जिल्ह्यांचे एकूण कार्यरत सदस्य

👉 महत्त्वाची नोंद :- सद्यस्थितीत चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तिनही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या शून्य आहे. त्यामुळे केवळ मनपा, नगर परिषद आणि नगर पंचायतींचे सदस्यच या निवडणुकीत मतदान करू शकतील.
👉 १७ मतदान केंद्रांवर होणार मतदान; चंद्रपुरात मतमोजणी
मतदान केंद्र :-मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे तिनही जिल्ह्यांत मिळून एकूण १७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
मतमोजणी:-मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीची मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर पार पडणार आहे.
निवडणूक निरीक्षक :- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

🙏 जय विदर्भ 🙏

👉 वेगळा विदर्भ  झालाच पाहिजे.