Home Breaking News भद्रावती येथील प्राचीन भवानी माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार...

भद्रावती येथील प्राचीन भवानी माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न!

भद्रावती :-धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना; भाविकांना मिळणार अधिक सोयी-सुविधा महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत भद्रावती येथील प्राचीन भवानी माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा मा. आमदार करणभाऊ देवतळे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
भवानी माता मंदिर परिसराचा कायापालट करून त्याचा सुनियोजित विकास व सौंदर्यीकरण व्हावे, जेणेकरून येथे येणाऱ्या हजारो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, तसेच क्षेत्रातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळावी या उद्देशाने हे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून, स्थानिक विकासालाही मोठी गती मिळणार आहे.
🙏 मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती 🙏
या गरिमापूर्ण सोहळ्याला भवानी माता मंदिराचे अध्यक्ष ईश्वरजी गौरकार, अनिलजी धानोरकर, संजयजी वासेकर, कुलते साहेब, अमितजी गुंडावार, वृषालीताई पांढरे, प्रशांतजी डाखरे, विशालजी ठेंगणे, गोपालजी गोस्वाडे, इम्रानजी खान, किशोरजी गोवरदीपे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 नागरिकांमधून व्यक्त झाले समाधान 🙏
उपस्थित सर्व मान्यवर आणि स्थानिक नागरिकांनी मंदिर परिसराच्या विकासासाठी शासनाकडून करण्यात येत असलेल्या या कामांचे मनापासून स्वागत करत तीव्र समाधान व्यक्त केले. भविष्यातही धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी अशाच लोकहितकारी कामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

🙏 जय विदर्भ 🙏