Home जिल्हा वरोरा येथे युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ; BLA नियुक्ती व SIR संदर्भात...

वरोरा येथे युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ; BLA नियुक्ती व SIR संदर्भात मार्गदर्शन

 

वरोरा : युवासेना वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी लहान विठ्ठल मंदिर, माढेळी नाका, वरोरा येथे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्ती तसेच SIR संदर्भातील कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला युवासेना कार्यकारणी सदस्य तथा चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख हर्षलजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांची प्रमुख उपस्थिती होती.ही बैठक युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.

हर्षलजी शिंदे यांनी BLA नियुक्तीचे महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक बूथवर सक्षम आणि जबाबदार कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच SIR संदर्भातील आवश्यक प्रक्रिया, नियोजन आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विक्रांत चचडा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली.

या बैठकीस युवा सेना संघटक सुमित हस्तक, युवासेना विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल, युवासेना तालुकाप्रमुख प्रणव पारेलवार, शहर प्रमुख चेतन सातपुते, अनिकेत राजुरकर, सुबोध कुरेकर, अविनाश निब्राड, सागर कपाटे, आकाश लोखंडे यांच्यासह अनेक युवासैनिक तसेच युवासेना व युती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठक शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, संघटनात्मक बळकटीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

🙏 जय विदर्भ 🙏