Home जिल्हा कामगार दिनीच कामगाराचा बळी ; वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथे कंत्राटदाराच्या वाहनाने चिरडले...

कामगार दिनीच कामगाराचा बळी ; वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथे कंत्राटदाराच्या वाहनाने चिरडले गावकरी आणि पत्रकारांच्या आंदोलनापुढे कंत्राटदार झुकला; मयताच्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत

वरोरा :- अभिषेक किशोरराव भागडे
एकीकडे संपूर्ण जग ‘कामगार दिन’ साजरा करत असतानाच, वरोरा तालुक्यातील चरूरखटी तासनाला जवळ रोडच्या कामावर असलेल्या एका निष्पाप कामगाराला जय गिरनार( बसंत सिंग) च्या कंपनीच्या वाहनाने काळ बनून चिरडले. या भीषण अपघातात सुनील मानिकराव कुमरे (राहणार नांद्रा) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी आणि पत्रकारांनी रणशिंग फुंकले, अखेर प्रशासकीय रेट्यापुढे झुकत कंत्राटदाराने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे.
👉 नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, चरूरखटी गावाजवळील तास नाल्याजवळ रस्त्याचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. १ मे रोजी काम सुरू असतानाच कंत्राटदाराच्या मालकीच्या (MH 34 CO 1484) या वाहनाने सुनील मानिकराव कुमरे यांच्या (MH 34 AY 1097) दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील माणिकराव कुमरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
👉लोकशक्तीचा विजय : जचरूरखटी, नांद्रा, वंधली, पांजुर्णी, ऐकोना व ईतर गावकरी आणि पत्रकार एकवटले.
अपघाताची बातमी समजताच वंधली ‘देशोन्नती’चे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोयर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. संतापलेल्या गावकऱ्यांनी कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ठिय्या मांडला. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. अखेर बाळासाहेब भोयर  यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कंत्राटदाराने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आणि तणाव निवळला.
👉 बांधकाम विभागाला ठोकणार जाब !
या अपघातानंतर बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्त्याचे काम करताना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना (Safety measures) केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी ‘देशोन्नती’चे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोयर यांनी आक्रमक मागणी केली आहे की, “रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे फलक व बॅरिकेड्स लावण्यात यावेत.” या मागणीसाठी लवकरच बांधकाम विभागाला समस्त गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
सध्या वरोरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व योग्य रीतीने  या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, दोषी वाहनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

” या संपूर्ण माहितीकडे स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा चे विशेष लक्ष राहील ”

🙏 जय विदर्भ 🙏