वणी :- स्थानिक शासकीय मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेटचा थरार अखेर एका भव्य समारोप सोहळ्याने संपन्न झाला. ‘वणी प्रीमियम लीग – मनसे चषक २०२६’ या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत ‘ZIHU 11’संघाने विजेतेपदावर मोहोर उमटवली. ४ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाचा चषक जिंकत या संघाने वणीच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे.
अंतिम लढतीत ‘ZIHU 11’ चा दबदबा
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ‘ZIHU 11’ ने यवतमाळच्या ‘नाईट रायडर्स’ संघाचा पराभव केला. उपविजेत्या ‘नाईट रायडर्स’ संघाला २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेले ‘विजेत्या संघ मालकाला दुचाकी मोटारसायकल’ हे बक्षीस प्रदान करताना प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
⭕स्पर्धेचा आढावा⭕
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा १० एप्रिलपासून सुरू झाली होती. आमदार संजय देरकर आणि राजू उंबरकर यांच्या हस्ते स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ झाला होता. १८ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
“वणीतील तरुणाईला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शैलेश ढोके, नदीम शेख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
🛑 खेळाडूंचा गौरव: वैयक्तिक पुरस्कार 🛑
स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले:
👉 मॅन ऑफ द सिरीज :- रवी राजुरकर (अष्टपैलू कामगिरीसाठी)
👉 बेस्ट बॅट्समन :- शोएब खान (सर्वाधिक धावा)
👉 बेस्ट बॉलर :- अथर्व (अचूक गोलंदाजी)
या सोहळ्याला वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वणी परिसरातील क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा एक अविस्मरणीय पर्व ठरली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




