धाबा :- अभिषेक भागडे ( वरोरा )
या कार्यक्रमास आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे , अमर बोडलावार, दीपक सातपुते, किशोर अगस्ती, सुहास माडुरवार, विजय देशमुख, राजा चिलमंतवार, बबनराव पत्तीवार, राकेश पून, स्वप्निल अनमुलवार, इंद्रपाल घुळसे, निलेश पुलगमकर, सौ. वैष्णवी बोडलावार, नंदाताई घोगरे, अरुणाताई जांभूळकर, अश्विनीताई तोडासे, स्वातीताई वडपल्लीवार, बाबुराव बोमकंठीवार, भानेश थेगेवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात श्री क्षेत्र धाबाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेतला. “धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधा उभारणे नाही, तर त्या माध्यमातून समाजाला अध्यात्मिक बळ देणे होय. अशा कार्यातून मिळणारे आत्मिक समाधान हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
आपल्या कार्यकाळातील विविध ऐतिहासिक व धार्मिक प्रकल्पांचा उल्लेख करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या उभारणीपासून ते देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या विकासापर्यंत अनेक कामांचा आढावा घेतला. शिखर शिंगणापूर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृह, तुळशी वृंदावन उद्यान, श्रीशैलम येथे उभारण्यात आलेले ध्यानमंदिर, पाकिस्तानच्या बॉर्डर वर छत्रपती शिवाजी महाराजां अश्वारूढ putla उभारणे यांसारख्या प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविणे, शिवरायांची वाघनखे भारतात परत आणणे यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे मिळालेल्या समाधानाचाही त्यांनी उल्लेख केला.
आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे या तीर्थक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सुधीरभाऊंचा कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहीन. त्यांच्या सहकार्याने या देवस्थान परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, धाबा तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.




