रोटरी उत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्साहाची दणदणीत पेटती ज्योत; माननीय आमदार करणदादा देवतळे यांची प्रमुख उपस्थिती

वरोरा ✍️( अभिषेक भागडे ): रोटरी क्लब आयोजित रोटरी उत्सवाच्या पाचव्या दिवशी देखील उत्साह ओसंडून वाहत होता. सर्व वयोगटातील नागरिकांच्या उपस्थितीमुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते.

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार करणदादा देवतळे हे आपल्या धर्मपत्नींसह उपस्थित राहिले. त्यांनी उत्सवाला शुभेच्छा देत आयोजकांचे कौतुक केले आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असे सांगितले.
उत्सवाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवर व नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

( बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा.☎️9673574711☎️8329889732)
—🙏( जय विदर्भ )🙏—