Home Breaking News हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८

हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशात सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ३७५८ इतकी आहे. मागील २४ तासांत ३६३ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

१८१८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सकाळी ८ वाजता जारी करण्यात आली आहे.

मागील २४ तासांत २ कोरोना (Corona Virus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात ६३ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे जीव गेला आहे. ज्यांना आधीच विविध आजार होते. केरळमध्ये २४ वर्षीय युवतीचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक १४००, महाराष्ट्रात ४८५, दिल्लीत ४३६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये ३२०, पश्चिम बंगालमध्ये २८७, कर्नाटकात २३८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत तामिळनाडूत १९९ तर उत्तर प्रदेशात १४९ कोविड रुग्ण सापडले आहेत.

२४ तासांत कुठे किती कोविड रुग्ण सापडले?

राज्यरुग्ण संख्या
केरळ६४
पश्चिम बंगाल८२
दिल्ली६१
गुजरात५५
उत्तर प्रदेश३२
महाराष्ट्र१८
तामिळनाडू१४
आंध्र प्रदेश
पुडुचेरी
हरियाणा
कर्नाटक
मध्य प्रदेश
आसाम
सिक्किम
ओडिशा
राजस्थान
गोवा
पंजाब
उत्तराखंड

एकूण सक्रीय रुग्ण किती?

राज्यरुग्ण संख्या
केरळ१४००
महाराष्ट्र४८५
दिल्ली४३६
कर्नाटक२३८
पश्चिम बंगाल२८७
तामिळनाडू१९९
उत्तर प्रदेश१४९
गुजरात३२०
पुडुचेरी४५
राजस्थान६२
हरियाणा३०
आंध्र प्रदेश२३
मध्य प्रदेश१९
पंजाब
जम्मू काश्मीर
झारखंड