Home महाराष्ट्र ‘या’ तारखेपासून मुंबईतील ५ टोल नाक्यांवर टोलमाफी

‘या’ तारखेपासून मुंबईतील ५ टोल नाक्यांवर टोलमाफी

मुंबई (Mumbai) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांसह मुंबईत येणाऱ्या असंख्य वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री 12 वाजेपासून लागू होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री १२ वाजेपासून मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू नसणार आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai district name
Mumbai population
Mumbai game
Mumbai Indians
Mumbai city name
Where is Mumbai located in India