Home जिल्हा पंतप्रधान सूर्यघर सौर ऊर्जेतून मोफत वीज

पंतप्रधान सूर्यघर सौर ऊर्जेतून मोफत वीज

 

महायुती सरकारमुळे विजेच्या बिलात बचत

निरगुडसर (Nirgudsar) :- पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडुप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महावितरणाच्या या परिमंडळात ६०० ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत. आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे. यामध्ये ठाणे शहरात ५३ तर वाशीमध्ये १५० पेण मध्ये ३९७ आणि एकूण ६०० इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे विजेचे बिल बचत झाले. या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते. तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौरऊर्जे कडे वाढत आहे. महायुती सरकारमुळे विजेचे बिलाची बचत होत आहे.

घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे. या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.