Home महाराष्ट्र राज्यात आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार

राज्यात आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार

हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Update :- राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा (Maharashtra Weather Update) जोर पुन्हा एकदा वाढणर असल्याचा अंदाज आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा (Maharashtra Weather Update) अंदाज वर्तण्यात आला आहे.

काही ठिकाणी पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) वर्तवली आहे पुण्यामध्ये आज ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.