वरोरा :- येन्सा गावातील शासकीय पाणीपुरवठ्यातून मिळणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रार समोर आली आहे. आज पाणी भरताना पाण्यामध्ये पक्ष्याचे पिसे आढळून आले असून, पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या घटनेचा फोटोही समोर आला आहे.गावातील अनेक नागरिक याच शासकीय पाणीपुरवठ्यावर पिण्यासाठी अवलंबून असल्याने पाण्याच्या स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची योग्य देखभाल व नियमित तपासणी होत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.या गंभीर बाबीकडे संबंधित शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व ग्रामसेवक यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने तारिक प्रशासनाने/संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पाण्याची तपासणी करावी, तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची स्वच्छता करून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.पाण्याच्या दूषिततेमुळे अतिसार (Diarrhoea), टायफॉइड यांसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. येन्सा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर नागरिकांची मागणी शासकीय पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात यावा.




