Home जिल्हा चंद्रपूर ते पारडी गोकुळाष्टमी निमित्त भव्य पायदळ दर्शन वारी उत्साहात संपन्न

चंद्रपूर ते पारडी गोकुळाष्टमी निमित्त भव्य पायदळ दर्शन वारी उत्साहात संपन्न

वरोरा :- गोकुळाष्टमीच्या पवित्र औचित्याने ‘अखंड परिवार’ द्वारा आयोजित चंद्रपूर ते पारडी भव्य पायदळ दर्शन वारी (विदर्भ पंढरी पारडी) अत्यंत उत्साहात जात असताना वरोरा येथे भक्तिमय वातावरणात पार पडत विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारडी येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारीमध्ये शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
या धार्मिक वारीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. वरोरा येथे शिवाजी वार्ड मध्ये मागील वर्षी व यावर्षी भेट देते यामध्ये वरोरा चे सुनील लक्षणे, रमेश येसेकर, चंदू गौरकार, विकास भाऊ कडवे, प्रकाश भाऊ कडवे आणि रामकृष्ण लक्षणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहकार्याने संपूर्ण वारीचे नियोजन करण्यात आले.
रस्त्यावरून भगव्या पताका, पारंपरिक वाद्ये आणि विठूनामाचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीने संपूर्ण मार्गावर आध्यात्मिक वातावरण निर्माण केले होते. परिसरातील नागरिकांनी वारीचे ठिकठिकाणी स्वागत केले. गोकुळाष्टमीच्या या आनंदोत्सवात सहभागी होऊन भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेतला.