Home जिल्हा लखमापूर येथे शेतकरी संघटना आणि सरपंचांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश; आमदार देवराव भोंगळे...

लखमापूर येथे शेतकरी संघटना आणि सरपंचांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश; आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

कोरपना (दि. ४) भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्ता प्राप्त करणारा पक्ष नसून तळागाळातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत कार्य करणारा पक्ष आहे. पक्षाची धोरणे सर्वसमावेशक विकासाला गती देणारी असून, भाजप हाच लोकहिताचे कार्य करणारा प्रमुख पक्ष असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.



लखमापूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते मोरेश्वर आस्वले आणि निमणीचे सरपंच अतुल धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काल (दि. ३) भारतीय जनता पक्षामाध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार भोंगळे बोलत होते.पुढे बोलताना आमदार भोंगळे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांना अभूतपूर्व गती मिळाली आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच भाजपचे मुख्य ध्येय असून, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना आणि विकास पोहोचविण्यासाठी पक्ष सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार देवराव भोंगळे यांनी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे भाजपाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले. आमदार भोंगळे यांच्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा झंझावात आणि त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे मत यावेळी नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, अरुण रागीट, राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिष ताजने, नगरसेवक सतीश बेतावार, हिमांशु नामवाड, प्रफुल कावळे, संगीता गावत्रे, कीर्ती वैरागडे, सपना सेलोकर, नम्रता डुकरे, कवठाळा सरपंच रुपाली बोबडे यांच्यासह अशोक झाडे, संजय नीत, रवी बंडीवार, प्रमोद कोडापे, श्रीकृष्ण गोरे, विशाल पावडे, नरसिंग हामने, दिनेश खडसे, संजय थिपे, ज्ञानेश्वर पानघाटे, आबाजी बोबडे, अविनाश वाभिटकर, सचिन बोंडे, राजू डाखरे, विशाल गज्जलवार, पुरुषोत्तम निब्रड, समशेर शेख, प्रदीप पारखी, निलेश भिवापुरे, अनिल संकुलवार, सुरेश चौधरी, शंकर उरकुडे, दिलीप काकडे, रवींद्र वडस्कर, सुरेश बुऱ्हान, शंकर शेंडे, रवींद्र नांदे, मारोती पांढरे, नामदेव येडमे, भाऊराव जुमनाके आदींसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.