Home जिल्हा भारतीय जनता पार्टी, वरोरा तथा महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय जनता पार्टी, वरोरा तथा महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न!

वरोरा :- बंध, आपुलकी व स्नेहाचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टी वरोरा आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वरोरातर्फे एका भव्य स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



🙏 महत्त्वाचे मुद्दे व कार्यक्रमाची माहिती🙏
भव्य आयोजन :- भारतीय संस्कृतीतील जिव्हाळ्याच्या सणाला एकत्र येऊन महिला वर्गात आपुलकी वाढवण्याच्या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती :- कार्यक्रमास मा. हंसराजजी अहिर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री) वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय युवा तडफदार आमदार करणदादा संजय देवतळे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभनार आहे.
दिनांक व वेळ :- रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ११:०० वाजता हा सोहळा पार पडनार आहे
स्थळ :- सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीबद्दल थोडी माहिती
भारतीय जनता पक्षाची महिला शाखा म्हणून ‘महिला मोर्चा किंवा महिला आघाडी’ ही संघटना महिलांच्या सामाजिक आणि राजकीय अधिकारांसाठी कार्यरत असते. राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक स्तरावर महिलांना सक्षम बनवणे, त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि त्यांना राजकीय व सामाजिक प्रवाहात समान संधी मिळवून देणे हे या आघाडीचे मुख्य धोरण आहे. वरोरा येथेही महिला आघाडीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम नेहमीच यशस्वीपणे राबवले जातात.या सुंदर आणि आनंददायी सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.