Home Breaking News नागपुरात ४०० विद्यार्थ्यांची कमाल; बांबू आणि टाकाऊ वस्तूंपासून साकारली ७५ फुटी ‘महा...

नागपुरात ४०० विद्यार्थ्यांची कमाल; बांबू आणि टाकाऊ वस्तूंपासून साकारली ७५ फुटी ‘महा राखी’

नागपूर :- रक्षाबंधनाचे औचित्य साधत नागपुरातील ललिता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून तब्बल ७५ फूट लांब आणि ६५ फूट रुंद अशी भव्यदिव्य ‘महा राखी’ तयार केली आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही संपूर्ण राखी पर्यावरणपूरक (Eco-friendly) साहित्यापासून बनवण्यात आली आहे.



“यंग पॉवर, ग्रीन फ्यूचर” थीमवर आधारित निर्मिती
या महा राखीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “यंग पॉवर, ग्रीन फ्यूचर” (Young Power, Green Future) हा संदेश दिला आहे. एका बाजूला पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि दुसऱ्या बाजूला भारतीय लष्कराच्या शौर्यास व रक्षतत्वाप्रती आदर व्यक्त करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची कलाकृती साकारल्याने नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.



🙏 टाकाऊ वस्तूंमधून साकारली कलाकृती 🙏
बाजारातील प्लास्टिक किंवा रासायनिक साहित्याचा वापर टाळून ही राखी पूर्णपणे नैसर्गिक आणि पुनर्वापरयोग्य (Recyclable) वस्तूंपासून तयार करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने:
💥  बांबू आणि ताग (Jute)
💥 नारळाच्या शहाण्या आणि नैसर्गिक लाकूड
💥 विद्यार्थ्यांनी गोळा केलेली सुकलेली व टाकाऊ पाने
अशा विविध पर्यावरणपूरक घटकांचा वापर करून ही आकर्षक राखी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेमुळे पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा एक नवा आदर्श समोर आला आहे.