Home विदर्भ विदर्भ संघटन मजबुतीसाठी भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न; प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण 

विदर्भ संघटन मजबुतीसाठी भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न; प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण 

नागपूर :- 21 ऑगस्ट 2026 आज नागपूर येथील ग्रँड एअरपोर्ट बॅनक्वेट हॉलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ विभागाची ‘SIR’ अभियान संदर्भातील महत्त्वाची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी आगामी संघटनात्मक वाटचालीवर आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.



💥 बैठकीतील ठळक मुद्दे 💥
संघटन बांधणीवर भर :– विदर्भ विभागाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष महोदयांनी केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती :- या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे, ‘SIR’ महाराष्ट्र प्रभारी भगवानदास साबनानी, तसेच ‘SIR’ प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा सहभाग :- विदर्भातील विविध भागांमधून आलेले लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आगामी रणनीती आणि संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.