Home जिल्हा बेलगाव/आटमुर्डी येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; २०११ ते २०२६ च्या जमा-खर्चाचा हिशेब मागण्यासाठी...

बेलगाव/आटमुर्डी येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; २०११ ते २०२६ च्या जमा-खर्चाचा हिशेब मागण्यासाठी ग्रामसभा घेण्याची ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी!

वरोरा :- वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत आटमुर्डी अंतर्गत येणाऱ्या बेलगाव/आटमुर्डी येथील ग्रामस्थांनी गावातील समस्यांच्या निवारणासाठी आणि पारदर्शकतेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील पाच वर्षांहून अधिक काळ म्हणजेच २०२१ ते २०२६ या काळातील विकास कामांचा व जमा-खर्चाचा सविस्तर हिशेब मागितला असून, ग्रामसभा तात्काळ बोलावण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत आटमुर्डी (पं.स. वरोरा, जि. चंद्रपूर) यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. जो पर्यंत ग्रामसभा होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ व ( महीला )खाली उतरणार नाही असाही संदेश देण्यात आलेला आहे.



काय आहेत प्रमुख मागण्या?
💠 गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तात्काळ ग्रामसभा आयोजित करावी.
💠  वर्ष २०२१ ते २०२६ पर्यंतच्या सर्व विकास कामांच्या जमा-खर्चाची माहिती अहवालासह ग्रामसभेत खुली करण्यात यावी.



💥 ग्रामस्थांचा तीव्र संताप व वाढता दबाव 💥
गावातील समस्या सोडवण्याकडे आणि पारदर्शक कारभार करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागील अनेक वर्षांचा हिशेब मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या निवेदनावर कुसुम देवानंद वैद्य, उषा अरुण तुरारे, विद्या सुरेश तुरारे, भागाबाई देवराव परचाके, रुपाली विलास ढेगळे, शोभाताई निखाडे, लक्ष्मी चिंधु निखाडे, शशीकला जनार्दन तुरारे, कालीदा नानाजी तुरारे, शारदाबाई मेघश्याम तुरानकर, प्रेमिला धनश्याम तुरानकर, रत्नमाला गणपतराव नागपुरे, लिला बडु झोडे, विद्या महादेव तुरानकर, पल्लवी किरण तुरानकर, नंदा प्रविण तुरानकर, पुजा सोमेश्वर वैद्य, उज्वला प्रफुल्ल वैद्य, वंदना गजानन वैद्य, चंद्रकला नानाजी वैद्य, बेबी विकास देठे, प्रमिला महेश येवले, सारिका नितेश येवले, वंदना नानाजी ढेगळे, संगिता शंकर ढेगळे, लना महादेव गावंडे, सुरेखा गिरीधर गावंडे, प्रिया पुंडलीक तुराळे, शुभांगी नामदेव तुराळे, आणि मोनिका विजय तुराळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लवकरात लवकर ग्रामसभा न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही याप्रसंगी दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.