Home Breaking News death : महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांचे निधन

death : महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांचे निधन

चंद्रपूर, 27 मे : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी आनंद वसंतराव कुमरे आज, सोमवारी 27 मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 48 वर्षांचे होते. गेल्या पाच वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आणि मोठा आप्तपरिवार आहे. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी म्हणून 2008 पासून आनंद कुमरे यांनी भांडूप, कल्याण, अकोला, नागपूर व चंद्रपूर येथे काम केले आहे. त्यापूर्वी पत्रकारिता करीत असताना चंद्रपूर येथे लोकमत टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते. महावितरणचे अतिशय प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी असलेले आनंद कुमरे हे चित्रकार, काष्ठ शिल्पकार व मूर्तीकार देखील होते. चंद्रपूर येथे आनंद कुमरे(Anand Kumar) यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथे अंत्यसंस्काऱ करण्यात आले.