चंद्रपूर :- आदरणीय श्री. सुधीरभाऊस वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.आयुष्य किती सुंदर आणि सुखःद आहे. तसेच आयुष्यातील क्षण किती अनमोल असताता. काल झालेली गुरुपौर्णिमा आणि आज भाऊंचा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग माझ्यासाठी किती अनमोल आहे. माझ्या जीवनात मला लाभलेले सुधीरभाऊ आणि कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यपुर्तीचा अभ्यास.
भाऊ म्हणजे शासन, सहकार, राजकारणासोबत समाजकाराण, धार्मिकता, शेतकरी, शेतमजुर, गरीब जनांचा उध्दारक, भाऊ म्हणजे जनहीत कार्यच चालतं बोलतं विद्यापीठ.
भाऊ म्हणजे न्याय, निष्ठा, तर्क, अभ्यासपूर्ण विवेचन.
भाऊ म्हणजे जन जीवनातील सगळयाच समस्यांचे समाधान.
भाऊ म्हणजे अश्रुंची फुले करणारं संवेदनशील नेतृत्व.
भाऊंचा सहवास मला लाभने म्हणजे माझ्या आयुष्याचा भाग्योदय होय.
माझ्यासाठी आदरणीय भाऊसाहेब सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा शिकण्याचा, घडण्याचा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
भाऊसाहेबांनी मला केवळ काम शिकवले नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाचे दुःख आपले समजून त्याच्या मदतीसाठी धावून जाण्याची भावना दिली. जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच खरे यश असते, हा विचार त्यांच्या प्रत्येक कृतीतून अनुभवायला मिळतो.
आज त्यांचा वाढदिवस… माझ्यासाठी हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर माझ्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. त्यांच्या सहवासात मिळालेला विश्वास, प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे.
ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करतो की, भाऊसाहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि समाजसेवेचे अधिक बळ लाभो. त्यांच्या हातून असेच असंख्य जनकल्याणकारी कार्य घडत राहो, असंख्य गरजूंना आधार मिळत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाचा प्रकाश लाखो कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहो.
भाऊसाहेब, तुमच्यासारखा नेता लाभणे हे आमच्यासाठी भाग्य आहे. तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्यावर सदैव असेच राहो.
आपण शतायुषी व्हावे, निरोगी राहावे आणि समाजसेवेचा हा अखंड प्रवास असाच सुरू राहावा, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, भाऊसाहेब! शुभेच्छुक निश्चल वरुडकर




