Home जिल्हा आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात जनसेवा तेथे आरोग्य; ४२ रुग्णांची पहिली तुकडी...

आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात जनसेवा तेथे आरोग्य; ४२ रुग्णांची पहिली तुकडी विनामोफत शस्त्रक्रियेसाठी सावर्गीकडे रवाना!

गडचांदूर :- दि. २३ जुलै सामान्यांच्या जीवनात आरोग्याचा प्रकाश पसरवण्यासाठी कटिबद्ध असलेले आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर येथे राबविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा अक्षरशः धडाका पाहायला मिळत आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांवर उपचाराचा मार्ग सुकर झाला असून, आज शिबिरातील ४२ रुग्णांची पहिली तुकडी विविध महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावर्गी (मेघे) येथे दिमाखात आणि उत्साहात रवाना झाली आहे!



💥 महाआरोग्य शिबिराचा दणदणीत प्रतिसाद💥
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील आमदार देवराव भोंगळे यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय तथा सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावर्गी (मेघे) यांच्या सहकार्याने स्थानिक स्व. भाऊराव चटप आश्रमशाळेत दिनांक २२ जुलै रोजी भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले होते. या शिबिराला गडचांदूर शहर व परिसरातील तब्बल २०१७ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. त्यापैकी ३५६ रुग्ण विविध शस्त्र्रियांसाठी पात्र ठरले असून, या सर्व पात्र रुग्णांवर सावर्गी येथे मोफत शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.



रुग्णांना हिरवी झेंड्या दाखवून दिला आधाराचा निरोप
पात्र ठरलेल्या रुग्णांपैकी ४२ रुग्णांची पहिली तुकडी शस्त्रक्रियेसाठी आज (दि. २३) सकाळी आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जनसंपर्क कार्यालय गडचांदूर तथा आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथून बसने रवाना करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सर्व रुग्णांना यशस्वी शस्त्रक्रियेसाठी व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपचे गडचांदूर शहराध्यक्ष अरुण डोहे, तालुका महामंत्री सतीश उपलेंवार, महेश घरोटे, योगेश बांदूरकर, रामदास जिवतोडे, श्रीधर मंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार देवराव भोंगळे यांच्या या प्रभावी आणि जनहितकारी उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेमधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.