Home जिल्हा अखिल भारतीय तेली समाजाच्या संघटन बांधणीसाठी चंद्रपुरात विचारमंथन बैठक संपन्न!

अखिल भारतीय तेली समाजाच्या संघटन बांधणीसाठी चंद्रपुरात विचारमंथन बैठक संपन्न!

चंद्रपूर :- अखिल भारतीय तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जयदत्तजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात तेली समाजाची संघटनात्मक ताकद अधिक वाढवण्याच्या दृष्टीने मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात एका महत्त्वाच्या विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले.



या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी माजी खासदार श्री. सुरेशजी वाघमारे यांनी चंद्रपूरला विशेष भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील समाजबांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणी, युवकांचा सक्रिय सहभाग, सामाजिक एकोपा आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.



🙏 प्रमुख उपस्थितांचे स्वागत 🙏
बैठकीच्या प्रारंभी श्री. दीपक बेले , माजी नगरसेविका सौ. छबूताई वैरागडे , माजी नगरसेवक श्री. देवेंद्र बेले श्री. बालकृष्ण वैरागडे , श्री. शैलेश जुमडे , श्री. निश्चल बेले आणि श्री. उमेश येणुरकर यांनी माजी खासदार श्री. सुरेशजी वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी डॉ. रविंद्र येणुरकर , श्री. कुणाल पडोळे , श्री. आशिष वंदिले , श्री. राजाभाऊ माहूरे , श्री. प्रकाश देवतळे , नगरसेवक ,श्री. रवी लोणकर , श्री. राहुल क्षीरसागर  आणि श्री. सुजल आंबटकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



🙏 बैठकीतील ठळक मुद्दे व संकल्प 🙏
संघटन विस्तार :- समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या जबाबदाऱ्या देऊन, प्रत्येक गाव, शहर आणि जिल्हास्तरावर संघटना अधिक मजबूत व सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले.



सर्वांगीण विकास :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्याचा दृढ निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



युवा नेतृत्वाला प्राधान्य :- आगामी काळात युवकांच्या हातात नेतृत्वाची धुरा देऊन त्यांना संघटन विस्तारात सक्रिय करण्याची रणनीती आखण्यात आली.